--Advertisement--

Register for Maharashtra SSC Result 2018 Here

Register for Maharashtra HSC Result 2018 Here

Register for Maharashtra Board Result 2018 Here

SSC Result: दहावीचा निकाल उद्या, दुपारी 1 वाजेपासून रिझर्ल्ट पाहा एका क्लिकवर

महाराष्‍ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) निकाल शुक्रवारी (8 जून) रोजी सकाळी 11 वाजता जाहीर झाला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेनंतर ‍ऑनलाइन विषय‍निहाय गुण पाहाता येतील. गुणपत्रिकेची प्रिंटही घेता येईल.

यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल 89.41 टक्के लागला असून कोकण विभाग अव्वल (96 टक्के) तर नागपूर विभागाचा सर्वात कमी (85.97 टक्के) निकाल लागला आहे.
 
महाराष्‍ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-2018 मध्ये घेतलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील 4028 शाळांचे निकाल 100 टक्के आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
LIVE UPDATES:
 
- राज्याचा एकूण निकाल 89.41 टक्के
- कोकण विभाग अव्वल- 96 टक्के
- नागपूर विभागाचा सर्वात कमी- 85.97 टक्के
- यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी
- मुलींची टक्केवारी- 91.97 टक्के
- मुलांची टक्केवारी -87.27 टक्के
- मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.70 टक्के अधिक
- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 86.87 टक्के
- 100 टक्के गुण मिळवणारे लातूर (70) आणि औरंगाबाद (23) येथे सर्वाधिक विद्यार्थी
 
विभागनिहाय निकाल...
कोकण - 96.00 %
कोल्हापूरः 93.88.%
पुणेः 92.08%
मुंबईः 90.41 %
नाशिकः 87.82 %
औरंगाबादः 88.81%
अमरावतीः 86.49%
लातूरः 86.30%
नागपूरः 85.97%

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मार्च- 2018 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवारी (8 जून) सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येतील. सात दिवसांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत मिळतील.

एका क्लिकवर पाहा निकाल
दैनिक दिव्य मराठीचे संकेतस्थळ www.divyamarathi.com वर दहावीचा निकाल पाहाण्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी तसेच पालक शुक्रवारी, दुपारी 1 वाजेपासून https://www.bhaskar.com/india-result/maharashtra-board-ssc-result.html वर निकाल पाहू शकतील.

दरम्यान, 12 वीचा निकाल 30 मे रोजी जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. दहावीचा निकाल तयार झाला असून तो शुक्रवार 8 जूनला सकाळी 11 वाजता जाहीर करण्‍यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाने अधिकृत जाहीर केले आहे. शारदा सभागृहात सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होईल. त्यात विभागनिहाय निकाल जाहीर करण्‍यात येईल, असेही सुत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा मार्च महिन्यामध्ये झाल्या. यंदा एकूण 18 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे या निकालांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कसा पाहाल निकाल?
दैनिक दिव्य मराठीचे संकेतस्थळ www.divyamarathi.com वर  दहावीचा निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. www.divyamarathi.com वर  क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बॅनर (येथे पाहा दहावीचा निकाल) दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर https://www.bhaskar.com/india-result/maharashtra-board-ssc-result.html ही युआरएल उघडेल. त्यावर तुमचा मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी भरावा लागले. तुमची नोंदणी झाल्यानंतर पहिल्या रकान्यात तुमचा सीट नंबर (उदा.M123456) आणि दुसर्‍या रकान्यात तुमच्या आईचे नावातील पहिले तीन अक्षरे (उदा.MOH) लिहावे लागेल. नंतर स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल. 

Maharashtra Board Class 10th News

Click to listen..
विज्ञापन
विज्ञापन