--Advertisement--

उत्पादन पीएमआय चार महिन्यांच्या नीचांकावर, मंदीचा परिणाम

उत्पादन पीएमआय चार महिन्यांच्या नीचांकावर, मंदीचा परिणाम

Dainik Bhaskar

Jan 17, 2018, 12:44 PM IST
Image 1 Image 1
नवी दिल्ली - देशातील उत्पादन क्षेत्रातील हालचाली (अॅक्टिव्हिटी) या वर्षी चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. नवीन ऑर्डर नसल्याने उत्पादन अॅक्टिव्हिटीमध्ये घट झाली आहे. मार्च महिन्यात या आकडेवारीत वाढ नोंदवण्यात आली होती. उत्पादनात आलेल्या या मंदीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेवर व्याजदरात घट करण्याचा दबाव वाढला आहे. निक्केई भारत उत्पादन खरेदी निर्देशांक (पीएमआय) एप्रिलमध्ये ५०.५ वर आला असून तो मार्चमध्ये ५२.४ होता. हा निर्देशांक उत्पादन क्षेत्रातील गती दर्शवतो. हा निर्देशांक ५० च्या वर असल्यास उत्पादन क्षेत्रातील हालचालींत वाढ होत असल्याचे दिसून येते. हा निर्देशांक ५० वर कायम असल्यास स्थिरता समजते आणि ५० च्या खाली आल्यास नकारात्मक घट मानली जाते.
नकारात्मक

मंदीचा इशारा
भारतातील पीएमआय निर्देशांक उत्पादन क्षेत्रात मंदी असल्याकडे इशारा करत असल्याचे मत निक्केईचा अहवाल तयार करणारी संस्था मार्किटचे अर्थतज्ज्ञ पाॅलियाना डी लीमा यांनी व्यक्त केले.

मंदीची कारणे
- देशांतर्गत ऑर्डर स्थिर असून विदेशातून मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये सहा महिन्यांपासून मंदी आहे.
- कच्च्या मालाचा साठा वाढला असून तयार मालाचा साठा कमी झाला आहे.
- कच्च्या मालाचे पैसे जमा झाले नाहीत तर पुरवठ्यात अडचणी अाल्या.
- कंपन्यांची कॉस्ट ११ महिन्यांत सर्वात तेजीने वाढली आहे.
- उत्पादनातील पाचपैकी चार क्षेत्रांतील मंदीत वाढ नोंदवण्यात आली.

कोअर क्षेत्रातील वाढ उच्चांकावर
मार्च महिन्यात आठ कोअर क्षेत्रांतील वाढ ६.४ टक्क्यांच्या आकड्यासह १६ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. ही वाढ रिफायनरी, फर्टिलायझर आणि सिमेंट उत्पादनातील वाढीमुळे झाली आहे. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, रिफायनरी उत्पादने, फर्टिलायझर, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटी क्षेत्रात भारताच्या एकूण आैद्योगिक उत्पादनात ३८ टक्के भागीदारी आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात यात ०.७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये ६.७ टक्के होती.
image 2 image 2
आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ७१ अंकांच्या घसरणीसह २५,२३० च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १९ अंंकांच्या घसरणीसह ७७३१ च्या पातळीवर बंद झाला.
 
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यामुळे त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला. यामुळे भारतीय शेअर बाजारातदेखील घसरण नोंदवण्यात आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय शेअर बाजारात एफएमसीजी निर्देशांक सोडल्यास इतर सर्वच क्षेत्रांतील निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली. बँक निफ्टीमध्ये अर्धा टक्के, ऑटो, फार्मा आणि मीडियामध्ये एक टक्क्यापेक्षा जास्तची घसरण दिसून आली, तर आयटीसीची आकडेवारी चांगली जाहीर झाल्यामुळे एफएमसीजी निर्देशांकात अडीच टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या वाढीसह एफएमसीजी निर्देशांक २०,२१२ वर बंद झाला.
X
Image 1Image 1
image 2image 2
Bhaskar Whatsapp

Recommended

Click to listen..